Ad will apear here
Next
इला फाउंडेशनला आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार
हवामान बदलासंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान
केंद्रीय राज्यमंत्री कृष्णन रेड्डी, बाबुल सुप्रियो यांच्या हस्ते इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार स्वीकारला.

पुणे : रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस इंडिया कंपनीच्या वतीने नुकतेच यंदाच्या आरबीएस अर्थ हिरो पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निसर्ग आणि पक्षी संवर्धन क्षेत्रासाठी दर्शवलेल्या बांधिलकीसाठी इला फाउंडेशनचा आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे हे यंदाचे नववे वर्ष असून, हवामान बदलासंदर्भात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील विविध व्यक्तींचा या वेळी सन्मान करण्यात आला.

केंद्रीय राज्यमंत्री कृष्णन रेड्डी, बाबुल सुप्रियो, निती आयोगाचे सदस्य रमेश चंद, विशेष सचिव सिद्धांत दास यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी आरबीएस फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरबीएस इंडियाचे सस्टेनिबिलीटी प्रमुख एन. सुनील कुमार, आरबीएस इंडियाच्या सेवा विभागाचे देश प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज फातरफोड उपस्थित होते.

इला फाउंडेशन ही बिगर सरकारी नोंदणीकृत चॅरिटी संस्था विविध निसर्ग संवर्धन उपक्रम राबवते. भारतीय वन सेवा, भारतीय सैन्य दल, पशुवैद्यकीय आणि आरोग्य सेवा, शाळा आणि विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि तळागाळातील समाजाबरोबर काम करत ती निसर्ग संवर्धनाच्या मुलभूत संकल्पना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवत आहे.

या वेळी ओडिशाच्या प्रमिला बिसोई यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानचे भोलू अबरार खान, आसामचे दिम्बेश्वर दास यांना ग्रीन वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर उत्तरप्रदेशच्या ऐश्वर्या माहेश्वरी आणि तामिळनाडूचे एस. सतीश यांना सेव्ह द स्पेसीज पुरस्कार देण्यात आला. काश्मीरचे जलालउददीन बाबा यांना इन्स्पायर विभागातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZQSCH
Similar Posts
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात उद्घाटन पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
पुण्यात होणार जागतिक घुबड परिषद पुणे : ‘तस्करी आणि जादूटोण्यामुळे धोक्यात आलेल्या घुबडांच्या संवर्धनासाठी येत्या २९ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत पुण्यात जागतिक घुबड परिषद (वर्ल्ड आउल कॉन्फरन्स) आयोजित करण्यात आली आहे. घुबडांना वाचविण्यासाठी भारतात पहिल्यांदाच राष्ट्रीय पातळीवरील परिषद होत असून, त्याचा मान पुण्याला मिळाला आहे
‘कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गो-विज्ञान केंद्र स्थापन करणार’ पुणे : ‘देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी पुण्यात व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language